मुक्त खेळ (पुनरावृत्ती)
इयत्ता ६-८
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
सत्राचे नाव
Full Ownership
वयोगट
वयोगट १२-१४
सत्राचा उद्देश
मुले पूर्णपणे स्वतंत्रपणे Free Play चालवतात; सूत्रधाराचा सहभाग कमीत कमी असतो.
लागणारे साहित्य
Free Play Kit
वर्गाची मांडणी
1. हे सत्र शाळेतील हॉल किंवा मैदानासारख्या मोकळ्या जागेत होऊ शकते.
2. Kit त्याच्या खोक्यांमध्येच राहू द्या. मुले स्वतः जागेची मांडणी करतील.
3. मुले स्वतःचे 4-6 जणांचे गट बनवतील आणि कुठे खेळायचे ते ठरवतील.
4. मांडणीपासून तुम्ही बाजूला रहा - हे त्यांनी चालवायचे आहे.
1/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)
PEP-UP: Human Knot (5 min)
1. 6 ते 10 जणांचे गट गोलात उभे राहतील.
2. स्थिती A: प्रत्येक जण आपल्या दोन्ही बाजूंच्या व्यक्तींचे हात धरेल.
3. स्थिती B: प्रत्येक जण आपले हात एकमेकांत अडकवून (Cross करून) दोन्ही बाजूंच्या व्यक्तींचे हात धरेल.
4. हात न सोडता संपूर्ण गटाने गुंता सोडवून पुन्हा स्थिती A मध्ये यायचे आहे.
5. कोणता गट सर्वात लवकर गुंता सोडवतो अशी स्पर्धा लावा.
FREE PLAY NORMS (1 min)
1. खेळ सर्वांनी मिळून वापरा.
2. आपल्या पाळीची वाट पहा.
3. एकमेकांशी प्रेमाने वागा.
4. साहित्य मोडू-तोडू नका.
5. झाल्यावर सर्व काही व्यवस्थित आवरा.
6. हे जोडा: शिक्षक किंवा सूत्रधार पाहत नसतानाही हे नियम तसेच राहतात.
अधिक Pep-up पर्याय
2/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)
START PLAY:
1. मुले कोणत्याही सूचनांशिवाय स्वतः मांडणी करून खेळ सुरू करतील.
DURING PLAY:
1. फक्त निरीक्षण करा आणि मनात नोंदी घ्या - काय जमते आहे, मुले कशी खेळतात आणि कोणाबरोबर खेळतात.
2. सुरक्षेचा धोका असल्याशिवाय काही सुचवू नका किंवा मध्ये जाऊ नका.
STEP IN WHEN NEEDED:
1. सुरक्षेचा धोका असेल तरच मध्ये जा.
2. मुलांना वाद सोडवता येत नसेल तर थोड्या वेळासाठी मध्ये जा आणि लगेच बाहेर पडा.
3. मुले पूर्णपणे गोंधळलेली दिसली तर मध्ये जा, काही सूचना द्या आणि ती खेळू लागली की पुन्हा बाजूला व्हा.
तुम्हाला काय दिसू शकते
1. काही गट खूप शिस्तबद्ध असतील, काही मोकळे. दोन्ही पद्धती योग्य आहेत.
2. कोण नेतृत्व करते, कोण अनुसरण करते, कोण नवीन घडवते, कोण समजूत काढते ते पहा.
3. आधी Free Play मध्ये अडखळणारी मुले आता अधिक सहज खेळताना दिसायला हवीत.
3/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
समारोप (~३–५ मिनिटे)
1. खेळ संपण्याच्या दोन मिनिटे आधी मुलांना सूचना द्या.
2. मुलांना विचारा - खेळादरम्यान कोणी केलेली सर्वात कल्पक गोष्ट तुम्ही पाहिली?
3. मुलांनी आपला खेळ स्वतः सांभाळला आणि चालवला याचे कौतुक करा.
4. मुलांना सर्व साहित्य आवरायला मदत करायला सांगा.
पुढच्या वेळी प्रयत्न करा
1. मुले संपूर्ण वर्गासाठी एक Free Play सत्र आखतील आणि चालवतील.
2. निम्मे साहित्य काढून ठेवा आणि मुलांना कमी साहित्यात अधिक कल्पक व्हायला सांगा.
3. एकाच सूचनेसह Free Play घ्या - तुमचे स्वतःचे नवीन खेळ तयार करा.
