मुक्त खेळ (परिचय)
पूर्वप्राथमिक
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
सत्राचे नाव
Let's Explore!
वयोगट
वयोगट ३-५
सत्राचा उद्देश
मुलं Free Play Kit शी ओळख करून घेतील आणि पहिल्यांदाच साहित्याचा मोकळेपणाने व सुरक्षितपणे शोध घेतील.
लागणारे साहित्य
Free Play Kit
वर्गाची मांडणी
1. हे Session शाळेतील हॉल, मैदान किंवा इतर मोकळ्या जागेत घेता येते.
2. Free Play Kit उघडा आणि साहित्य 2-3 सैल गटांमध्ये जमिनीवर किंवा बाकाजवळ ठेवा.
3. ठराविक Stations ठेवायची गरज नाही - जिथ े साहित्य असेल तिथे मुलं जमा होतील.
4. मुलं एकटी किंवा स्वतःहून 4-6 जणांच्या छोट्या गटांमध्ये खेळतील.
1/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)
PEP-UP: Name and Action (2-3 min)
1. प्रत्येक मूल स्वतःचे नाव सांगेल आणि एक कृती करून दाखवेल.
2. बाकीची सगळी मुलं ती कृती करून दाखवतील.
3. प्रत्येक मुलाने फक्त एक कृती करायची.
FREE PLAY NORMS (1 min):
1. खेळणी आणि साहित्य सगळ्यांसोबत शेअर करा.
2. तुमच्या पाळीची वाट पाहा.
3. एकमेकांशी प्रेमाने वागा.
4. साहित्याची मोडतोड करू नका.
5. खेळ झाल्यावर सगळे साहित्य नीट आवरून ठेवा.
6. लक्षात ठेवा - शिक्षक किंवा Facilitator बघत नसले तरी हे नियम कायम राहतील.
अधिक Pep-up पर्याय
2/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)
START PLAY:
1. मुलांना सांगा की ते कोणत्याही साहित्याजवळ जाऊन खेळायला सुरुवात करू शकतात.
2. त्यांना हवे तेव्हा दुसऱ्या साहित्याकडे जाऊन खेळू शकतात हेही सांगा.
3. मागे व्हा. साहित्य कसे वापरायचे हे मुलांना सांगू नका.
DURING PLAY:
1. मुलांमध्ये फिरा आणि त्यांचे निरीक्षण करा. खेळात रमलेल्या मुलांना मध्येच थांबवू नका.
2. एखादे मूल गोंधळलेले वाटत असेल, तर त्याच्या शेजारी बसा आणि एखादी वस्तू हातात घ्या. उत्सुकता दाखवा. मूल सहसा स्वतःहून खेळात सहभागी होते.
3. दोन मुलांना एकाच वस्तूची गरज असेल, तर तुम्हाला जे दिसते ते सांगा – "तुम्हा दोघांनाही ही वस्तू हवी आहे. आता तुम्ही काय करू शकता?"
STEP IN WHEN NEEDED:
1. एखादे मूल साहित्य फेकत असेल किंवा त्याचा वापर मारण्यासाठी करत असेल तर शांतपणे त्याला दुसऱ्या साहित्याजवळ घेऊन जा.
2. एखाद्या ठिकाणी खूप गर्दी झाली असेल तर दुसऱ्या साहित्याजवळ जा. काही मुलांना तिकडे बोलवा आणि त्यांच्यासोबत खेळ सुरू करा.
3. मुलांचा खेळ चुकीचा आहे असे कधीही सांगू नका.
तुम्हाला काय दिसू शकते
1. काही मुलांना सुरुवातीला काय करायचे ते समजणार नाही. हे पूर्णपणे सामान्य आहे.
2. अनेक मुलं फक्त वस्तू उचलून फिरतील, रचतील किंवा पाडतील. हाही खेळच आहे.
3, Kitchen Set किंवा Puppets वापरून Pretend Play खूप लवकर सुरू होतो.
4. काही मुलं साहित्य त्यांच्या जागेवर घेऊन जाऊ इच्छितील. त्यांना तसे करू द्या.
3/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
समारोप (~३–५ मिनिटे)
1. खेळ संपायला दोन मिनिटे बाकी आहेत याची सूचना द्या.
2. सगळ्यांना वर्तुळात बसवा.
3. सांगा - "मी कोणाला तरी काहीतरी बांधताना आणि मग ते पाडताना पाहिलं. किती मजा आली! तुम्ही आज कशासोबत खेळलात?"
3-4 मुलांची उत्तरे ऐका.
4. सगळ्यांनी मिळून साहित्य आवरा. हे काम जलद आणि आनंदाने करा.
पुढच्या वेळी प्रयत्न करा
1. प्रत्येक वेळी हे Session घेताना एखादे साहित्य वापरण्याची एक नवीन पद्धत दाखवा.
2. मुलांना विचारा - कोणते नियम बदलायचे किंवा नवीन जोडायचे आहेत?
3. मुलांना स्वतः शोध घेऊ द्या आणि खेळण्याच्या नवीन पद्धती तयार करू द्या.
