top of page

​बांधा आणि तयार करा

इयत्ता १–२

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सत्राचे नाव

Make Something!

वयोगट

वयोगट ६-८

सत्राचा उद्देश

मुले बांधकाम संचांचा वापर करून बांधकाम करतात आणि एकत्र मिळून छोटी आव्हाने स्वीकारतात.

लागणारे साहित्य

- Super Architect / Lego (2)
- Jodo Blocks (1)
- Jodo Straws (1)
- Jumbo Blocks (1)
- Jenga (1)
- Mechanix Plastic (2)
- Mechanix Basic (1)
- Mechanix Beginner Assortment (3)

वर्गाची मांडणी

1. 4-6 जणांचे गट तयार करा.
2. प्रत्येक गटाला एक बांधकाम संच द्या आणि त्यांच्या जागेत साहित्य ओतून ठेवा.
3. बांधकाम बाकांवर किंवा बाकांमधील मोकळ्या जागेत होईल.

1/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)

PEP-UP: Bholu Says (3-4 min)
1. मुले आपापल्या बाकाजवळ उभी राहतील.
2. सूत्रधार Bholu Says ने सुरू होणाऱ्या कृती सांगेल.
3. Bholu Says ऐकू आले तरच मुलांनी ती कृती करायची.
4. उदाहरणे: Bholu Says नाकाला हात लावा, Bholu Says दोनदा उडी मारा, गोल फिरा (हे करायचे नाही!).

NORMS (30 seconds):
1. साहित्य सर्वांनी मिळून वापरा.
2. पाळीने खेळा.
3. एकमेकांशी प्रेमाने वागा.
4. दुसऱ्याने केलेले बांधकाम मोडू नका.

अधिक Pep-up पर्याय

2/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)

FREE BUILD (8 min):
1. गटांना साहित्य द्या आणि मुलांना त्यांना हवे ते बांधू द्या.
2. पहिली 5 मिनिटे मध्ये न बोलता फिरून पहा.

THE CHALLENGE (Free Build नंतर):
1. आधाराशिवाय उभा राहील असा सर्वात उंच टॉवर बांधा.
2. आता तोच टॉवर फक्त 15 तुकडे वापरून पुन्हा बांधा.
3. त्याच्या वर एक पेन्सिल तोलून ठेवा.

YOUR ROLE DURING PLAY:
1. गटांना एकमेकांना मदत करण्यास प्रोत्साहन द्या.
2. बांधकाम पडले तर मुलांना विचारा - ते टिकण्यासाठी आणखी काय करून पाहता येईल?

STEP IN WHEN NEEDED:
1. गट वेगवेगळा झाला - हरकत नाही; प्रत्येकाला आपापला भाग बांधू द्या.
2. साहित्य कमी पडत असेल - गटांना साहित्य वाटून घ्यायला किंवा डिझाइन सोपे करायला सांगा.

तुम्हाला काय दिसू शकते

1. वेळ जाईल तशी मुले अधिक सर्जनशील होतात. त्यांना बांधण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
2. काही गट आपापसात कामाची वाटणी करतील, तर काही सगळे मिळून बांधतील. दोन्ही ठीक आहे.
3. साहित्य एकमेकांत मिसळेल. ते ठीक आहे.

3/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

समारोप (~३–५ मिनिटे)

1. शेवटची 5 मिनिटे उरली की मोठ्याने सांगा.
2. प्रत्येक गट आपल्या बांधकामाबद्दल एका वाक्यात सांगेल.
3. मुलांना साहित्य योग्य त्या खोक्यांमध्ये परत भरायला सांगा.
4. शेवटी विचारा - आज बांधताना सर्वात कठीण काय वाटले?

पुढच्या वेळी प्रयत्न करा

1. वेळेचे आव्हान द्या: 8 मिनिटांत सर्वात उंच टॉवर बांधा.
2. तेच साहित्य वापरून गटांना एकमेकांची बांधकामे पुन्हा बनवायला सांगा.
3. सर्वांनी मिळून एक बांधकाम करून पहा: प्रत्येक गट एका मोठ्या रचनेचा एक भाग बांधेल.

4/4

इतर खेळाच्या सत्रांचे Plans पाहा

Like
bottom of page