top of page

मुक्त खेळ (परिचय)

इयत्ता ६-८

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सत्राचे नाव

Own Your Play

वयोगट

वयोगट १२-१४

सत्राचा उद्देश

मुलं काय खेळायचं, कोणासोबत खेळायचं आणि कसं खेळायचं हे स्वतः ठरवतील आणि Free Play ची पूर्ण जबाबदारी स्वतः घेतील.

लागणारे साहित्य

Free Play Kit

वर्गाची मांडणी

1. हे Session शाळेतील हॉल, मैदान किंवा इतर मोकळ्या जागेत घेता येते.
2. Kit त्याच्या Box मध्येच ठेवा. जागेची मांडणी मुलं स्वतः करतील.
3. मुलं स्वतः 4-6 जणांचे गट तयार करतील आणि कुठे खेळायचे ते ठरवतील.
4. तुम्ही मांडणीत हस्तक्षेप करू नका. हे पूर्णपणे मुलांनी चालवायचे Session आहे.

1/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)

PEP-UP: Human Knot (5 min)
1. 6 ते 10 मुलांचे गट करून त्यांना वर्तुळात उभे करा.
2. Position A: प्रत्येकाने आपल्या दोन्ही बाजूंच्या मुलांचे हात धरायचे.
3. Position B: प्रत्येकाने हात क्रॉस करून पुन्हा दोन्ही बाजूंच्या मुलांचे हात धरायचे.
4. हात न सोडता पुन्हा Position A मध्ये येण्याचा प्रयत्न गटाने करायचा.
5. कोणता गट सर्वात लवकर Human Knot सोडवतो याची मैत्रीपूर्ण स्पर्धा घ्या.

FREE PLAY NORMS (1 min)
1. खेळणी आणि साहित्य सगळ्यांसोबत शेअर करा.
2. तुमच्या पाळीची वाट पाहा.
3. एकमेकांशी प्रेमाने वागा.
4. साहित्याची मोडतोड करू नका.
5. खेळ झाल्यावर सगळे साहित्य नीट आवरून ठेवा.
6. लक्षात ठेवा - शिक्षक किंवा Facilitator बघत नसले तरी हे नियम कायम राहतील.

अधिक Pep-up पर्याय

2/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)

START PLAY:
1. मुलांना कोणत्याही सूचनांशिवाय खेळ सुरू करू द्या.
2. एखादे मूल तुमच्याकडे पाहत असेल तर फक्त हसून मान हलवा आणि त्यांना स्वतः कसे खेळायचे ते ठरवू द्या.

DURING PLAY:
1. कोण पुढाकार घेत आहे, कोण मागे राहत आहे, कोण नवीन कल्पना सुचवत आहे आणि कोण वाद मिटवत आहे याकडे लक्ष द्या.
2. बोलण्याची गरज पडली तर खुले प्रश्न विचारा, जसे - "तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहात?" किंवा "खेळ कसा चाललाय?"
3. कोणताही ठराविक खेळ किंवा कृती सुचवू नका.

STEP IN WHEN NEEDED:
1. मुलांना स्वतः सोडवता येणार नाही असा वाद असेल किंवा सुरक्षिततेचा प्रश्न असेल तरच हस्तक्षेप करा.
2. खेळ 3 किंवा अधिक मिनिटांसाठी थांबला असेल तर विचारा - "आता सगळ्यांना काय करून पाहायचं आहे?" मुलांच्या सूचना ऐका आणि पुन्हा मागे व्हा.
3. मुलं काय निवडतात याची नोंद घ्या - पुढील Session चे नियोजन करताना त्याचा उपयोग होईल.

तुम्हाला काय दिसू शकते

1. काही गट लगेच आत्मविश्वासाने खेळायला सुरुवात करतील. काही गट निर्णय घेण्यासाठी वेळ घेतील. दोन्ही ठीक आहे.
2. काय खेळायचं याबद्दलची चर्चा आणि वाटाघाटी हाही खेळाचाच एक भाग आहे.
3. Session च्या सुरुवातीला काही वेळ शांतता असू शकते. मुलांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून स्वतः जाऊ द्या.

3/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

समारोप (~३–५ मिनिटे)

1. खेळ संपायला दोन मिनिटे बाकी आहेत याची सूचना द्या. मुलांना स्वतःहून खेळ आवरता घेऊ द्या.
2. सगळ्यांना एकत्र बोलवा आणि विचारा - "आज काय छान झालं?" आणि "पुढच्या वेळी तुम्ही काय बदलाल?"
3. मुलांची उत्तरं कोणताही न्याय न करता ऐका.
4. सगळ्यांनी मिळून साहित्य आवरून Session संपवा.

पुढच्या वेळी प्रयत्न करा

1. एका मुलाला Closing Circle चालवण्याची जबाबदारी द्या आणि साहित्य नीट आवरले जाते याची खात्री करण्यास सांगा.
2. मुलांना साहित्य अशा पद्धतीने वापरून पाहण्याचे आव्हान द्या, ज्या पद्धतीने त्यांनी याआधी कधीच वापरले नसेल.

4/4

इतर खेळाच्या सत्रांचे Plans पाहा

Like
bottom of page