top of page

​साहित्याशिवाय खेळ

इयत्ता ३–५

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सत्राचे नाव

Quick Thinkers

वयोगट

वयोगट ९-११

सत्राचा उद्देश

मुलं जलद विचार करायला लावणारे आणि सहकार्याची गरज असणारे खेळ खेळतील.

लागणारे साहित्य

कोणतेही साहित्य लागणार नाही.

वर्गाची मांडणी

1. कोणतेही साहित्य नसल्यामुळे वेगळी तयारी करण्याची गरज नाही.
2. संपूर्ण वर्गासोबतचे खेळ खेळताना बाकांमधील जागा आणि वर्गाचा पुढील भाग वापरा.
3. लहान गटांमध्ये खेळ खेळायचा असल्यास मुलांना मोजणी करून ४-६ जणांचे गट तयार करा.

1/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)

PEP-UP: Buzz (3-4 min)
1. एका मुलापासून सुरुवात करा. ते 1 म्हणेल, पुढचे मूल 2 म्हणेल आणि असे पुढे.
2. 3 च्या प्रत्येक पटीच्या संख्येऐवजी BUZZ म्हणायचे.
3. कोणी संख्या म्हटली तर मोजणी पुन्हा सुरू करायची.
4. आधी एक हळू फेरी घ्या आणि मग एक जलद फेरी घ्या.

NORMS (30 seconds):
1. मी "Hi" म्हटलं की तुम्ही "Hello" म्हणा.
2. तुमच्या पाळीची वाट पाहा. तुमच्या गटाला साथ द्या.
3. एकमेकांशी प्रेमाने वागा. सुरक्षितपणे खेळा.

अधिक Pep-up पर्याय

2/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)

WHOLE CLASS GAMES:

GAME 1 - Human Knot (8 min)
1. 6 ते 10 मुलांचे गट करून त्यांना वर्तुळात उभे करा.
2. Position A: प्रत्येकाने आपल्या दोन्ही बाजूच्या मुलांचे हात धरायचे.
3. Position B: प्रत्येकाने हात क्रॉस करून दोन्ही बाजूच्या मुलांचे हात धरायचे.
4. हात न सोडता पुन्हा Position A मध्ये परत यायचे.
5. कोणता गट सर्वात लवकर गुंता सोडवतो याची स्पर्धा करा.

GAME 2 - Category Countdown (10 min)
1. 2 Teams तयार करा. तुम्ही एक Category सांगा.
2. Teams ने त्या Category मधील गोष्टी एकामागोमाग एक सांगायच्या. पुनरावृत्ती नाही. थांबायचे नाही.
3. ज्या Team कडून पुनरावृत्ती होईल किंवा उत्तर सुचणार नाही ती Team फेरी हरेल.
4. उदाहरण Categories: चार पायांचे प्राणी, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, लाल रंगाच्या गोष्टी, वेगवेगळे व्यवसाय
5. 4-5 फेऱ्या खेळा.

GAME 3 - Wink Murder (8 min)
1. एका मुलाला Detective बनवा. त्याला वर्गाबाहेर पाठवा किंवा डोळे बंद करायला सांगा.
2. बाकी मुलांमधून शांतपणे एका मुलाला Murderer निवडा.
3. Detective परत येईल. Murderer इतर मुलांकडे डोळा मारेन.
4. ज्याला डोळा मारला जाईल त्याने हळूहळू आणि नाट्यमय पद्धतीने "मरल्यासारखे" दाखवायचे.
5. Detective ला Murderer ओळखण्यासाठी 3 अंदाज मिळतील.
6. वेगवेगळ्या मुलांना Detective आणि Murderer बनवत अनेक फेऱ्या खेळा.

जर मुलांना लहान गटांमध्ये खेळायला आवडत असेल तर हे पर्याय वापरा:

OPTION A - Shape Numbers (groups of 5-6)
1. एक संख्या सांगा. मुलांनी शक्य तितक्या लवकर त्या संख्येइतक्या जणांचे गट तयार करायचे.
2. ज्यांचा पूर्ण गट तयार होणार नाही ते एक फेरीसाठी बाहेर बसतील.

OPTION B - Mirror Game (pairs)
1. दोन मुलं समोरासमोर उभी राहतील. एक मूल हळूहळू हालचाली करेल.
2. दुसऱ्या मुलाने त्या हालचाली अगदी तशाच करायच्या.
3. 2 मिनिटांनंतर Leader बदला.

STEP IN WHEN NEEDED:
1. Human Knot मुळे मुलं खूपच त्रासलेली वाटत असतील तर एक Free Pass द्या (एकदा हात सोडून पुन्हा पकडण्याची परवानगी द्या).
2. Category Countdown मध्ये वाद होत असेल तर विचारा - "हे आधी सांगितलं होतं का?" नसेल तर उत्तर स्वीकारा आणि पुढे जा.

तुम्हाला काय दिसू शकते

1. काही गट Human Knot 2 मिनिटांत सोडवतील. काहींना 10 मिनिटे लागतील. दोन्ही ठीक आहे.
2. मुलं इतर गटांना मदत करण्याचा प्रयत्न करतील. हे चांगल्या सहकार्याचे लक्षण आहे - त्यांना तसे करू द्या.
3. Category Countdown मध्ये वाद होणे सामान्य आहे. शक्य असल्यास गटाला स्वतः तो सोडवू द्या.

3/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

समारोप (~३–५ मिनिटे)

1. प्रत्येक गट एकत्र बसू द्या.
2. प्रत्येकाने Session दरम्यान त्यांना कसे वाटले हे एका शब्दात सांगायचे.
3. शेवटी सगळ्यांना एकत्र आणून Group Clap Chain करा - एका टोकापासून सुरू करून दुसऱ्या टोकापर्यंत टाळ्यांची साखळी पोहोचवा.

पुढच्या वेळी प्रयत्न करा

1. Human Knot पूर्ण वेळ डोळे बंद ठेवून खेळून पाहा.
2. Category Countdown मध्ये Categories मुलांनाच निवडू द्या.

4/4

इतर खेळाच्या सत्रांचे Plans पाहा

Like
bottom of page