तुमचा मुक्त खेळाचा किट
मोकळा वेळ आहे? मुक्त खेळ करून पहा!
शिकण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि मज्जा करण्यासाठी खेळकर शक्यतांनी भरलेला एक बॉक्स.


मुक्त खेळ म्हणजे काय?
मुले स्वतःहून पुढाकार घेऊन खेळतात असा खेळ.
काय खेळायचे, कसे खेळायचे आणि किती वेळ खेळायचे, हे मुलेच ठरवतात. शिक्षक यात कोणतीही सूचना किंवा मार्गदर्शन करत नाहीत; हाच तर यातील मुख्य उद्देश आहे.
जेव्हा मुले स्वतः निर्णय घेतात, तेव्हा त्यांना नियोजन करणे, वाटाघाटी करणे, परिस्थितीनुसार जुळवून घेणे आणि समस्या सोडवणे या गोष्टींचा वारंवार सराव होतो.
छोटे क्षण, पण त्यातून होणारे शिक्षण मात्र अत्यंत प्रभावी!


मुक्त खेळादरम्यान शिक्षकांची भूमिका
• मागे राहवून निरीक्षण करा
• सर्वांची सुरक्षितता जपा
• मुले कशी शिकत आहेत याकडे लक्ष द्या
• लगेच समस्या सोडवण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवा

खेळण्याचे अनेक प्रकार
• कोणतीही एकच 'योग्य' पद्धत नाही
• जुळवणे, रचणे आणि वर्गीकरण करणे
• ठोकळ्यांपासून खेळ तयार करणे
• नवनवीन कल्पना करू देणे

मुक्त खेळातून विकसित होणारी कौशल्ये
• वाटाघाटी करणे
• सहयोग करणे
• ऐकून घेणे
• निवड करणे
• आपले म्हणणे मांडणे
• समस्या निवारण

मुक्त खेळ कसा घडवायचा

मुक्त खेळासाठी केवळ ३ नियम
१
सुरक्षित राहा.
अशा प्रकारे खेळा की सर्वजण सुरक्षित राहतील.
२
दयाळू राहा
वाटून घ्या, पाळीपाळीने खेळा आणि सर्वांना सामील करून घ्या.
३
काळजी घ्या.
साहित्याची काळजी घ्या.

मुले खेळत असताना कशाकडे लक्ष द्यावे?
मुक्त खेळ यशस्वी होत आहे जेव्हा मुले हे करतात किंवा बोलतात...

आळीपाळीने खेळणे
"आता माझी पाळी!"

नियम तयार करणे
"चला, ३ जणांचे गट करूया."


समस्यांवर चर्चा करणे
कोणी आधी जायचे हे ठरवणे

मिळून उभारणी करणे
"तू धरून ठेव, मी तो ठोकळा ठेवतो."

अपयश येऊनही पुन्हा प्रयत्न करणे
तुटल्यानंतर त्याची पुनर्बांधणी करणे

आनंदी आणि मग्न
तुझ्याकडे लक्ष द्यायला खूपच व्यस्त असणे

तुमच्या मुक्त खेळच्या किट मध्ये काय आहे?

बॉलिंग सेट

जोडो ब्लॉक् स

बुद्धिबळ

मोठे चेंडू

जंबो ब्लॉक्स

रिंग टॉस

जोडो स्ट्रॉज

उड्यांच्या दोऱ्या

उनो

लुडो

हुला हूप्स

सुपर आर्किटेक्ट

फोमचे चेंडू

मेकॅनिक्स

बॅट आणि बॉल

लगोरी

सापशिडी

फ्रिसबी

जेंगा

रॅकेट आणि चेंडू
निश्चित उपयोग नसलेले साहित्य, कोणतेही नियम नाहीत:
चेंडू, हुप्स, ठोकळे आणि दोर — मुलांना त्यांच्या इच्छेनूसार खेळता येते.
काही परिचित खेळ:
लुडो, सापशिडी आणि उनो, जे मुलांना आधीच माहीत आहेत आणि ते स्वतःहून खेळू शकतात.
खेळण्याचे साहित्य केवळ विकत मिळणाऱ्या वस्तूंपुरते मर्यादित नाही.
घरातील किंवा वर्गातील रोजच्या वापरातील वस्तूही तितक्याच चांगल्या प्रकारे वापरता येतात. आणि कोणतेही साहित्य एकाच खेळापुरते मर्यादित नसते: चेंडू पकडता येतो, घरंगळवता येतो, तोलता येतो, त्याची वर्गवारी करता येते किंवा तोलून धरता येतो.

तुमची स्वतःचे किट तयार करण्याचे काही मार्ग:
काय गोळा करावे
चेंडू, उड्या मारण्याचे दोर, जुनी खेळणी आणि इ तर कोणतीही अशी गोष्ट ज्यांनी खेळायला मुलांना आवडते.
सुट्या वस्तू
काठ्या, दोऱ्या, पुठ्ठा आणि इतर कोणतीही रोजच्या वापरातील साधनसामग्री, ज्यांचा वापर करून मुले कल्पकतेने खेळू शकतात.
साठवणूक
सर्व साहित्य एका डब्यात एकत्र ठेवा आणि ते अशा ठिकाणी ठेवा जिथे मुले स्वतःहून पोहोचू शकतील.
सुरक्षा महत्त्वाची: जोपर्यंत साहित्य मुलांसाठी सुरक्षित आहे, तोपर्यंत त्याचा वापर खेळण्याचे साहित्य म्हणून केला जाऊ शकतो.


खेळण्याच्या मजेशीर पद्धती

हुला हूप पास
मित्रांच्या वर्तुळात हात न सो डता एक 'हूप' (गोल कडी) फिरवा.
कसे खेळायचे ते पहा →

जेंगा
टॉवर उभा करा आणि मग टॉवर न पाडता आळीपाळीने त्यातील ठोकळे बाहेर काढा.
कसे खेळायचे ते पहा →

लगोरी
चेंडूच्या साहाय्याने दगड किंवा फरशांचा ढिगारा पाडा आणि त्यानंतर तो पुन्हा रचण्यासाठी शर्यत लावा.
कसे खेळायचे ते पहा →

रहस्यमय वस्तू
डोळ्यांवर पट्टी बांधून, केवळ स्पर्शाच्या आधारे तुमच्या हातात ठेवलेली वस्तू ओळखा.
कसे खेळायचे ते पहा →

गुपचूप बॉल
खेळाडू शांतपणे एकमेकांकडे चेंडू फेकतात. ज्याच्या हातून चेंडू निसटेल किंवा ज्याच्याकडून आवाज होईल, तो बाद होईल.
कसे खेळायचे ते पहा →

बोगदा चेंडू
एक वेगवान रिले शर्यत, ज्यामध्ये खेळाडू चेंडू आपल्या पायांमधून पुढे ढकलतात, पास करतात आणि वेगाने नेतात.
कसे खेळायचे ते पहा →
