top of page

​बांधा आणि तयार करा

पूर्वप्राथमिक

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सत्राचे नाव

Build It Big!

वयोगट

वयोगट ३-५

सत्राचा उद्देश

मुले ब्लॉक्स आणि बांधकाम साहित्य वापरून मोकळेपणाने बांधकाम करतात आणि त्यातून काय तयार करता येते ह्याचा अनुभव घेतात.

लागणारे साहित्य

- Jumbo Blocks / Brilliant (1)
- Shape Sorter Cube (4)
- Pyramid Rings (2)
- Super Architect / Lego (2)
- Jodo Blocks (1)
- Mechanix Basic (1)

वर्गाची मांडणी

1. जवळपास बसलेल्या मुलांचे 4-6 जणांचे गट तयार करा.
2. प्रत्येक गटाला एक बांधकाम साहित्याचा संच द्या.
3. मुले बाकांवर किंवा बाकांमधील मोकळ्या जागेत बांधकाम करतील.

1/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)

PEP-UP: Animal Freeze (2-3 min)
1. एखाद्या प्राण्याचे नाव सांगा.
2. मुले त्या प्राण्यासारखी हालचाल करतील.
सूत्रधार टाळी वाजवताच सर्वांनी स्थिर उभे राहायचे.
3. मग दुसऱ्या प्राण्याचे नाव सांगा.
4. दाहरणे: हत्ती, ससा, साप, माकड

NORMS (30 seconds):
1. साहित्य सर्वांनी मिळून वापरा.
2. पाळीने खेळा.
3. एकमेकांशी प्रेमाने वागा.
4. दुसऱ्याने केलेले बांधकाम मोडू नका.

अधिक Pep-up पर्याय

2/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)

FREE BUILD
1. गटांना साहित्य द्या आणि मुलांना त्यांना हवे ते बांधू द्या.
2. मुलांच्या बांधकामांबद्दल त्यांच्याशी गप्पा मारा.
3. त्यांना त्यांच्या कल्पना सांगायला आणि नवीन गोष्टी करून पाहायला प्रोत्साहन द्या.
4. मुले रमली असतील तर संपूर्ण सत्रभर हेच सुरू राहू द्या.

CHALLENGES (जर मुले फ्री बिल्ड ला कंटाळली आहेत):
1. मुलांना सांगा:
2. खूप उंच काहीतरी बांधा.
3. तुमच्या आवडत्या कार्टून पात्रासारखे काहीतरी बांधा.
4. तुमच्या पाळीव कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यासाठी घर बांधा.

YOUR ROLE DURING PLAY:
1. मुलांच्या उंचीपर्यंत खाली बसा आणि त्यांनी काय बांधले आहे ते विचारा.
2. एखादे बांधकाम पडले तर मुलांना पुन्हा प्रयत्न करायला प्रोत्साहित करा. त्यांना विचारा - वेगळे काय करता येईल?
3. शेवटच्या 5 मिनिटांत सर्व मुलांना एकमेकांची बांधकामे पाहण्यासाठी फेरी मारू द्या.

STEP IN WHEN NEEDED:
1. एखादे मूल दुसऱ्याचे बांधकाम मोडत असेल - चला, आपण मिळून ते पुन्हा बांधूया.
2.एखादे मूल सहभागी होत नसेल - यातील 5 तुकडे एकावर एक रचून दाखवशील का?

तुम्हाला काय दिसू शकते

1. काही मुले खूप साधी बांधकामे करतील, तर काही खूप गुंतागुंतीच्या गोष्टी बनवतील. दोन्ही ठीक आहे.
2. मुले वारंवार बांधतील, पाडतील आणि पुन्हा बांधतील. हा शिकण्याचा भाग आहे.
3. अनेक मुले त्यांच्या बांधकामांना नाव देतील किंवा त्यांच्याबद्दल गोष्टी सांगतील. त्यांना तसे करू द्या.

3/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

समारोप (~३–५ मिनिटे)

1. सांगा - आता तुमचे बांधकाम पूर्ण करा.
2. 2-3 मुलांना विचारा - तुम्ही काय बांधले?
3. सर्वांनी मिळून साहित्य आवरा.

पुढच्या वेळी प्रयत्न करा

1. मुलांना जोडीने काहीतरी बांधण्याचे आव्हान द्या.
2. एका ठराविक विषयावर बांधकाम करा. उदाहरण: शाळा, प्राणी किंवा वाहन.
3. मुलांना त्यांच्या बांधकामाबद्दल छोटेखानी गोष्ट सांगायला सांगा.

4/4

इतर खेळाच्या सत्रांचे Plans पाहा

Like
bottom of page