कल्पनारम्य खेळ
इयत्ता ६-८
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
सत्राचे नाव
Create Your World
वयोगट
वयोगट १२-१४
सत्राचा उद्देश
मुले Cards, Dice आणि कमीत कमी साहित्य वापरून जागच्या जागी प्रसंग रचतात.
लागणारे साहित्य
• Smart Sticks - India (1)
• Smart Sticks - Scavenger (1)
• Rolling Tales (2)
• Why Connect (2)
• Hand Puppets sets (1)
• Finger Puppets Family (1)
• Doctor set (2)
• Fruits and vegetables (2)
• Kitchen Set (2)
वर्गाची मांडणी
1. जवळपास बसलेल्या मुलांचे 4-6 जणांचे गट तयार करा.
2. प्रत्येक गटाला मिळेल: Rolling Tales चे 3 Dice, कोणत्याही 3-4 Smart Sticks, कोणती ही 3-4 Why Connect Cards आणि 1 साहित्य (Doctor Set, Puppets इ.)
3. गट बाकांवर किंवा बाकांमधील जागेत काम करतील.
4. ते आपली छोटी नाटके वर्गासमोर सादर करू शकतील.
1/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)
PEP-UP: Story Chain (3-4 min)
1. एक वाक्य सांगा. उदा.: एका नदीकाठी एक शाळा होती.
2. एका विद्यार्थ्याला गोष्ट पुढे नेणारे आणखी एक वाक्य जोडायला सांगा.
3. असेच एकेका विद्यार्थ्याकडे जात सर्वांपर्यंत पोहोचा.
NORMS (30 seconds):
1. Cards आणि Dice सर्वांनी मिळून वापरा.
2. पाळीने खेळा.
3. एकमेकांच्या कल्पनांचा आदर करा.
4. साहित्याची काळजी घ्या.
अधिक Pep-up पर्याय
2/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)
GETTING GROUPS STARTED:
1. प्रत्येक गटाला Rolling Tales चे 3 Dice, कोणत्याही 3-4 Smart Sticks, कोणतीही 3-4 Why Connect Cards आणि 1 साहित्य (Doctor Set, Puppets इ.) द्या.
2. Dice, Sticks आणि Why Connect Cards वापरून एक गंमतीशीर गोष्ट तयार करायला सांगा आणि साहित्य वापरून त्या गोष्टीचे छोटे नाटक करायला सांगा. गरज असेल तर प्रत्येक साहित्य कसे वापरायचे ते समजावून सांगा.
HOW TO USE THE MATERIALS:
- ROLLING TALES: Dice टाका. जी चित्रे येतील ती तुमच्या गोष्टीत आलीच पाहिजेत.
- SMART STICKS INDIA: Stick वरील माहिती म्हणजे तुमच्या गोष्टीतले ठिकाण किंवा एखादे पात्र.
- SMART STICKS SCAVENGER: ती वस्तू तुमच्या नाटकात शोधा किंवा अभिनयातून दाखवा.
- WHY CONNECT: Cards वरील चित्रे तुमच्या गोष्टीत आली पाहिजेत.
3. त्यांना सांगा - गटातील प्रत्येक जण गोष्टीतले एक पात्र साकारेल.
4. सर्वात चांगला अभिनय करण्याची आठवण करून द्या.
5. गटांना सांगा - गोष्ट तयार करण्यासाठी 10 मिनिटे आहेत, त्यानंतर संपूर्ण वर्गासमोर नाटक सादर करायचे आहे.
YOUR ROLE DURING PLAY:
1. प्रत्येक गटाकडे दोन-दोन मिनिटे लक्ष द्या. त्यांच्या चर्चेत व्यत्यय आणू नका.
2. उरलेली वेळ मोठ्याने सांगत रहा.
3. 10 मिनिटांनंतर तयार असलेल्या गटाला पुढे बोलावून नाटक सादर करायला सांगा.
4. मुलांना गोष्ट सांगण्याऐवजी पात्र बनून बोलण्यास प्रोत्साहन द्या.
5. सर्व गटांचे कौतुक करा.
STEP IN WHEN NEEDED:
1. गट अभिनयाऐवजी वाद घालत असेल - वेळेची आठवण करून द्या आणि अभिनय सुरू करायला सांगा.
2. प्रसंगात गोंधळ उडाला असेल - 30 सेकंद थांबवा आणि पुन्हा सुरू करा.
3. एखादा विद्यार्थी बाजूला राहत असेल - त्याला निवेदकाची भूमिका द्या; तो काय घडते आहे ते मोठ्याने सांगेल.
तुम्हाला काय दिसू शकते
1. मोठी मुले खेळातून गुंतागुंतीच्या नैतिक आणि सामाजिक प्रसंगांना भिडू शकतात.
2. Improv मधून खऱ्या भावना आणि मते समोर येऊ शकतात. हा खेळ आहे, ही चौकट स्पष्ट ठेवा.
3. काही विद्यार्थी अभिनयाला नकार देतील. त्यांना अभिनय करायला लावण्यासाठी ते एक आव्हान म्हणून मांडा.
3/4
तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप
समारोप (~३–५ मिनिटे)
1. प्रत्येक गट 30 सेकंदांत आपल्या गोष्टीतला एक खास क्षण सांगेल.
2. Cards, Dice आणि साहित्य आवरा.
3. विचारा - आज तुमच्या गोष्टीत तुम्हाला कशाचे आश्चर्य वाटले?
पुढच्या वेळी प्रयत्न करा
1. मुलांना स्वतःचे प्रसंग तयार करू द्या आणि ते इतर गटांना द्या.
2. सूत्रधाराच्या कोणत्याही सूचनांशिवाय मुलांना प्रसंग सादर करायला सांगा.
3. त्यांच्या स्वतःच्या शाळेशी किंवा गावाशी थेट जोडलेला एखादा प्रसंग करून पहा.
