top of page

​साहित्याशिवाय खेळ

इयत्ता १–२

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सत्राचे नाव

Fast and Funny

वयोगट

वयोगट ६-८

सत्राचा उद्देश

मुलं जलद विचार करायला लावणारे आणि थोडे Teamwork लागणारे, कोणतेही साहित्य न वापरणारे खेळ खेळतील.

लागणारे साहित्य

कोणतेही साहित्य लागणार नाही.

वर्गाची मांडणी

1. कोणतेही साहित्य नसल्यामुळे वेगळी तयारी करण्याची गरज नाही.
2. हालचालीसाठी बाकांमधील जागा मोकळी करा. मुलं त्यांच्या बाकाजवळ उभी राहतील.
3. Wink Murder आणि Four Corners हे संपूर्ण वर्गासोबत खेळले जातील.

1/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)

PEP-UP: Shake It Out (2-3 min)
1. उजवा हात 5 सेकंद हलवा, मग डावा हात, उजवा पाय, डावा पाय आणि शेवटी संपूर्ण शरीर हलवा.
2. एका मोठ्या Shake ने खेळ संपवा.

NORMS (30 seconds):
1. मी "Hi" म्हटलं की तुम्ही "Hello" म्हणा.
2. तुमच्या पाळीची वाट पाहा. एकमेकांशी प्रेमाने वागा, चिडवाचिडवी करू नका. सुरक्षितपणे खेळा.

अधिक Pep-up पर्याय

2/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)

GAME 1 - Zip Zap Zop (8 min)
1. मुलं त्यांच्या जागेवर उभी राहतील.
2. एका मुलाला निवडा. ते दुसऱ्या मुलाकडे बोट दाखवत "ZIP" म्हणेल.
3. ते मूल दुसऱ्या कोणाकडे बोट दाखवत "ZAP" म्हणेल.
4. पुढचे मूल दुसऱ्याकडे बोट दाखवत "ZOP" म्हणेल.
5. खेळ जलद गतीने चालू ठेवा. जो थांबेल किंवा चुकीचा शब्द बोलेल तो 1 फेरीसाठी बसून राहील.
6. शेवटी 4-5 मुलं उरेपर्यंत खेळा.
7. एकूण 2 फेऱ्या खेळा.

GAME 2 - Four Corners (8 min)
1. मुलांना 1 ते 4 मधील एक संख्या गुपचूप निवडायला सांगा. ती संख्या मांडीवर किंवा बाकाखाली बोटांनी दाखवायची.
2. 1... 2... 3... Show! म्हणा. सगळे आपापली संख्या दाखवतील.
3. Facilitator डोळे बंद करून 1 ते 4 मधील एक संख्या सांगेल.
4. ज्या मुलांनी ती संख्या निवडली असेल ते त्या फेरीत "Out" होतील आणि प्रेक्षक बनतील.
5. उरलेली मुलं पुन्हा एक नवीन संख्या निवडतील आणि खेळ सुरू राहील.
6. शेवटी 4-5 मुलं उरेपर्यंत खेळा.

GAME 3 - Wink Murder (8 min)
1. एका मुलाला Detective बनवा. त्याला वर्गाबाहेर पाठवा किंवा डोळे बंद करायला सांगा.
2. बाकी मुलांमधून शांतपणे एका मुलाला Murderer निवडा.
3. Detective परत येईल. Murderer इतर मुलांकडे डोळा मारेन.
4.ज्याला डोळा मारला जाईल त्याने हळूहळू आणि मजेशीर पद्धतीने "मरल्यासारखे" दाखवायचे.
5. Detective ला Murderer ओळखण्यासाठी 3 अंदाज मिळतील.
6. वेगवेगळ्या मुलांना Detective आणि Murderer बनवत अनेक फेऱ्या खेळा.

STEP IN WHEN NEEDED:
1. मुलांना Wink Murder समजत नसेल तर आधी एक पूर्ण फेरी करून दाखवा.
2. Four Corners मध्ये खूप गोंधळ होत असेल तर स्वतःचा आवाज कमी करा. मुलं सहसा तुमचे अनुकरण करतात.

तुम्हाला काय दिसू शकते

1. मुलं स्वतः खेळाचे नवीन नियम सुचवायला लागतील. त्यांना तसे करू द्या - ते Game Design शिकत आहेत.
2. काही मुलं खूप स्पर्धात्मक असतील. ते ठीक आहे. त्यांची ऊर्जा खेळात योग्य प्रकारे वापरण्यास मदत करा.
3. मुलं खूप उत्साही आणि गोंगाटी असतील. या Session मध्ये ते अपेक्षित आणि निरोगी आहे.

3/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

समारोप (~३–५ मिनिटे)

1. मुलांना पुतळ्यासारखे स्थिर उभे राहायला सांगा - 5... 4... 3... 2... 1... पूर्ण शांतता होईपर्यंत थांबा.
2. विचारा - आज तुम्हाला कोणता खेळ सर्वात जास्त आवडला? 2-3 मुलांची उत्तरे घ्या.
3. सगळ्यांनी मिळून टाळी वाजवून Session संपवा.

पुढच्या वेळी प्रयत्न करा

1. मुलांना त्यांनी खेळलेल्या एखाद्या खेळासाठी एक नवीन नियम सुचवायला सांगा.
2. Wink Murder असा खेळा की एकाच वेळी 2 Murderers असतील.
3. डोळे बंद करून Zip Zap Zop खेळून बघा - खूप कठीण आणि मजेशीर!
4. कोणत्याही खेळात एक Forbidden Word ठेवा - संपूर्ण Session मध्ये तो शब्द कोणीही बोलायचा नाही.

4/4

इतर खेळाच्या सत्रांचे Plans पाहा

Like
bottom of page