top of page

कल्पनारम्य खेळ

इयत्ता १–२

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सत्राचे नाव

Story Time, Play Time

वयोगट

वयोगट ६-८

सत्राचा उद्देश

मुले Puppets आणि प्रसंग वापरून स्वतःच्या छोट्या गोष्टी तयार करतात आणि सादर करतात.

लागणारे साहित्य

• Hand Puppets sets (1)
• Finger Puppets Family (1)
• Doctor set (2)
• Kitchen Set (2)
• Fruits and vegetables (2)

वर्गाची मांडणी

1. जवळपास बसलेल्या मुलांचे 4-6 जणांचे गट तयार करा.
2. प्रत्येक गटाला त्यांचे साहित्य द्या (Puppets, Doctor Set किंवा Kitchen Set, Fruits and Vegetables).
3. मुले आपल्या बाकाजवळ, बाकावर किंवा बाकांमधील जागेत खेळतील.

1/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

सुरुवातीची पद्धत (५–७ मिनिटे)

PEP-UP: Guess the character (3 min)
1. डॉक्टर, शिक्षक, म्हातारी व्यक्ती, बाळ किंवा स्वयंपाकी यांच्यासारखा अभिनय करा.
2. मुलांना ते पात्र ओळखायला सांगा.
3. काही मुलांनाही अभिनय करायला सांगा.

NORMS (30 seconds):
1. खेळणी सर्वांनी मिळून वापरा.
2. पाळीने पात्र बना.
3. एकमेकांशी प्रेमाने वागा.
4. Puppets आणि खेळण्यांशी हळुवारपणे वागा.

अधिक Pep-up पर्याय

2/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

खेळाची वेळ (~२५–२८ मिनिटे)

GETTING GROUPS STARTED:
1. गटांना सांगा - आज तुम्ही पात्र बनणार आहात आणि तुमचा सर्वात चांगला अभिनय करणार आहात.
2. प्रत्येक गटाला कोणतेही एक साहित्य/खेळणे द्या.
3. मुलांना कसे खेळायचे ते स्वतः ठरवू द्या.
4. त्यांना पात्र बनण्यासाठी प्रोत्साहन द्या. गरज असेल तर करून दाखवा.


YOUR ROLE DURING PLAY:
1. गटांमध्ये फिरत रहा. गोष्ट थांबली असेल तरच मध्ये जा.
2. एखादा गट अडला असेल - त्यांच्या पात्रांसमोर कोणत्या अडचणी येऊ शकतील याचा विचार करायला सांगा.
3. 10 मिनिटांनंतर प्रत्येक गटाला हळूच एक वळण सांगा - एक अनोळखी व्यक्ती येते / पाऊस सुरू होतो / कोणाला तरी एक surprise सापडते.

STEP IN WHEN NEEDED:
1. गटाच्या कल्पना संपल्या असतील - कोणीतरी दार वाजवते. कोण आहे?
2. मूल भूमिका घ्यायला नकार देत असेल - त्याला दिग्दर्शक बनवा: तू बाकीच्यांना काय करायचे ते सांग.
3. खरा वाद सुरू झाला असेल - एकमेकांशी प्रेमाने वागायची आठवण करून द्या.

तुम्हाला काय दिसू शकते

1. मुले खेळताना आपले पात्र बदलू शकतात. त्यांना बदलू द्या.
2. ओळखीचे प्रसंग (डॉक्टर, बाजार) उभे केल्याने मुलांना खऱ्या अनुभवांचा अर्थ लावायला मदत होते.
3. वर्गात नेहमी शांत असणारी मुले इथे खूप व्यक्त होऊ शकतात. ते लक्षात घ्या.

3/4

तयारी | सुरुवात | खेळाची वेळ | समारोप

समारोप (~३–५ मिनिटे)

1. प्रत्येक गट आपल्या गोष्टीचा शेवट सांगेल.
2. साहित्य आवरा.
3. विचारा - कोणते पात्र साकारायला तुम्हाला सर्वात जास्त आवडले?

पुढच्या वेळी प्रयत्न करा

1. मुलांना तीच गोष्ट जिथे थांबली तिथून पुढे नेण्यास सांगा.
2. खेळण्यापूर्वी मुलांना आपल्या पात्राचे नाव आणि काम लिहायला किंवा चित्रात काढायला सांगा.
3. प्रसंगांची सरमिसळ करून पहा: दवाखाना आणि बाजार एकत्र.

4/4

इतर खेळाच्या सत्रांचे Plans पाहा

Like
bottom of page